आजवर भेटी दिलेले प्रेक्षक

ती...



पावसात उभी

ती वीज जशी की

लखलखती तलवार...


रेखीव तनू

की शिल्प जणू

कोरीव शुद्ध कातळात...


मृदुंग नभीचे

अन नृत्य तियेचे

त्या अखंड वर्षावात...


उदक नेसली

चिंब जशी की

जलरुपा उभी जळात...


बेधुंद उर्वशी

की तिलोत्तमा ती

अप्सरा इंद्र दरबारात...


केश मोकळे

त्यास खेळवी

बेफिकीर द्रुत वात....


पायात ताल

नुपुरांचा नाद

घुमे अनाहत झंकार...


ती प्रणय दामिनी 

जणू रती उभी ती

ठेचण्या मदनाचा हंकार...


- प्रदिप काळे (Pradip Kale)


Background Picture courtesy - created using Ai ( chatgpt)


Picture edited & calligraphy by Pradip Kale 

Instagram - @pradipkale1996 & @_mukt_kalandar_

Facebook - Pradip Kale

----


-कवी-

-प्रदिप काळे

---------------------

All Rights reserved.©

muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©

या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सहदेव-भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा

( डिस्क्लेमर  : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्या...

Copyright©

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.


Copyrighted.com Registered & Protected