जर आपल्याला आपल्या हिश्याच्या जमिनीचे ( वा शेतजमिनीचे) अचुक ठिकाण (लोकेशन) माहीत नसेल तर ते कसे शोधता येईल

"बांधकाम डायरी" हा विभाग Quora वरुन हटवला गेला त्यामुळे हे उत्तर आणि मुळ प्रश्न ही हटवला गेला. त्यामुळे हे उत्तर जसे होते तसे या पेजवरच देत आहे. 

तर प्रश्न काहिसा असा होता की, 

" जर आपल्याला आपल्या हिश्याच्या जमिनीचे ( वा शेतजमिनीचे) अचुक ठिकाण (लोकेशन) माहीत नसेल तर ते कसे शोधता येईल? "

मी दिलेले उत्तर पुढील प्रमाणे...



🔶 ती जागा ज्या विभागात येते त्या विभागाच्या भुमी अभिलेख कार्यालयात जाऊन तुम्ही माहिती काढु शकता. याला वेळ लागु शकतो आणि कदाचित तुम्हाला हेलपाटे घालावे लागु शकतात. आणि थोडाफार खर्चही येऊ शकतो. याविषयी माहिती बाकिच्या उत्तरांत दिली आहेच. त्यामुळे मी दुसरी एक पध्दत सांगत आहे. (अवांतर : याला हवं तर निन्जा टेक्निक🥷 म्हणता येईल.😂)


🔶 हा प्रकार थोडासा किचकट वाटत असला तरी तुमचा वेळ, पैसा आणि हेलपाट्याने होणारा मनस्ताप वाचवु शकतो.


(महत्वाचे: ही पद्धत फक्त माहीती साठी सांगतोय, जी बहुतेकांना ठाऊक असेलही किंवा नसेलही , पण माझ्या माहीतीत तरी सध्या माझी मलाच सुचलेली, मी वापरलेली आणि सोपी वाटलेली पध्दत आहे. याच्याशी कुठलाही शासकीय विभाग सहमत असेलच असे नाही आणि ही पद्धत अनधिकृतही नाहीये. आणि कदाचित दिलेल्या संकेतस्थळावरील माहीतीही फक्त माहीतीपुरतीच मर्यादित आहे. कुठल्याही सरकारी किंवा खाजगी उपयोगासाठी नाहीये. )


आता मुळ विषयाकडे,


"तर यासाठी तुम्हाला इंटरनेट ब्राऊझींग बर्यापैकी जमायला हवं. त्याचबरोबर ज्या जागेचा तुम्हाला गट नं. हवा आहे ती जागा तुम्हाला सॅटेलाईट मॅप वरती ओळखता यायलाच हवी.(हे समजण्यासाठी गुगल मॅप वापरु शकता)"


तर मागच्या काही वर्षाखाली सरकारने सर्व ७/१२ नकाशे ऑनलाईन केले आहेत त्याचे हे संकेतस्थळ.


👇इथे टिचकी मारा. 

 भुनक्षा


ते असे दिसेल 👇 तिथे डाव्या बाजुला तीन रेषा दिसतील तिथे टिचकी मारा. (समजण्यास सोपे जावे म्हणून इमोजीज वापरले आहेत)


नतर असे 👇 दिसेल. तिथे आवश्यक ती सर्व माहिती भरा.(जिल्हा, तालुका,गाव) [मॅप टाईप व शिट नं. नाही भरले तरी चालेल]


माहीती भरल्यानंतर उजव्या बाजुच्या बाणावर टिचकी मारा.👇


संपुर्ण गावचा नकाशा, प्रत्येक गट नंबरसहीत तुमच्या स्क्रीनवर दिसेल. नंतर उजव्या बाजुच्या वरच्या कोपऱ्यात असलेल्या तीन रेषांवर टिचकी मारा 👆 व पुढे "Georeferenced map" या पर्यायावर टिचकी मारा. सॅटेलाईट नकाशासहीत ७/१२ नकाशा दिसेल.



आता इथुन पुढे थोडासं किचकट भाग आहे. तुम्हाला हवी असेल ती जागा ओळखुन त्या प्लॉटवर टिचकी मारली तर डाव्या बाजुच्या तीन रेषांच्या पॅनल मधे तुम्हाला त्याची आधिक माहीत दिसेल. अशा प्रकारे तुम्हाला जो हवा तो गट नंबर शोधता येईल. जर तुम्हाला लगतचे गट नंबर ठाऊक असतील तर मग अजुनच सोपे.(आसपास विचारुन ही माहीत काढु शकता, नसेल तरी ठीक आहे) . मग किचकट जाणार नाही.


इथुन तुम्ही नकाशा पिडिएफ मधेही डाऊनलोड करू शकता.


_______________


यासाठी तुम्हाला हायस्पीड डाटा व उत्तम नेटवर्क कव्हरेज गरजेचे आहे. कारण सॅटेलाईट मॅप व्यवस्थित दिसण्यासाठी ते आवश्यक आहे.

जर संगणकावर वापरलं तर अजुन उत्तम. तिथे सुटसुटीत दिसेल.

तळटीप :


प्रतिमा : ➡️ भुनक्षा संकेतस्थळस्थळाचे स्क्रिनशॉट


➡️ संकेतस्थळ


https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in (https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in)

धन्यवाद.

No comments:

Post a Comment

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सहदेव-भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा

( डिस्क्लेमर  : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्या...

Copyright©

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.


Copyrighted.com Registered & Protected