पाताळ यात्रा, ले.- अनिल ज.पाटील (कादंबरी अभिप्राय)

प्रत्येकाने वाचावे अशीच ही कादंबरी, श्री. वर्तकांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्या प्रमाणे इतर विज्ञान वा विलक्षण कादंबर्‍या सारखे फक्त कल्पनविलास नसूण त्यास सध्याचे विज्ञान व प्राचीन इतिहास यांचा आधार आहे. जो इतिहास आज आपल्याकडे केवळ दंतकथा मानला जातो व फक्त वेद व पुराणे यातच बंद आहे आणि ते जाणण्याचे कष्ट कुणीच घेत नाही. अनिल पाटील यांनी मूलभूत संशोधन ग्रंथांचा अभ्यास करून ठिकठिकाणी त्यांचे संदर्भही दिले आहेत.
आज अनेक ठिकाणांच्या संशोधनातून रामायण ,महाभारत यांचे पुरावे सापडत आहेत यांमुळे या दंतकथा,वा कल्पनाविलास नसून यात काहीतरी तथ्य आहे स्पष्ट आहे.
लेखकांनी कादंबरीच्या शेवटी संदर्भ ग्रंथांची सूची दिली आहे, त्याच बरोबर इंका सभ्यतेतील शब्दांचे संस्कृत व इतर भारतीय भाषेशी साम्य असलेली शब्दसूची दिली आहे. त्याबरोबरच कादंबरीत उल्लेख आलेल्या काही संदर्भाचे फोटोही दिले आहेत.
पौराणिक ग्रंथात उल्लेख असलेल्या "पाताळ लोक " या संकल्पनेवर आधारित कादंबरी आहे. पण त्याबरोबरच भारतवर्ष व दक्षिण अमेरिका यांचा प्राचीन संबंध याचीही माहिती आहे. त्याप्रमाणेच खंडांची पौराणिक ग्रंथात आढळणारी नावे व आताची नावे, अजून काही प्रदेशांची वेद व पौराणिक ग्रंथामध्ये आढळणार्‍या नावांचा व त्यांच्या आताच्या नावांचा संबंध सांगितला आहे.  माया संस्कृती ,इंका संस्कृती, मयासुर, बळीराजा व प्राचीन भारतीय संस्कृती यांचाही संबंध सांगितला आहे.काही ठिकाणी थोडंसं अतिशयोक्ती वाटेल बाकी वाचल्या नंतर कळेलच.
अनिल पाटील यांनी त्यांना पौराणिक ग्रंथातील गवसलेला हा अतिप्राचीन इतिहास कादंबरीच्या स्वरुपात थोडासा रंजक पद्धतीत सांगितला आहे.
त्यामुळे प्रत्येकाने विशेषतः या विषयात आवड असणार्‍यांनी तर एकदा अवश्य वाचावी अशीच ही कादंबरी आहे. बाकींनी एक रंजक व विलक्षण कथा म्हणुन वाचण्यास काहीच हरकत नाही.


-मुक्त कलंदर

_______________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

6 comments:

  1. तुमच्या ब्लॉग वरील लेख आवडले. मी bookstruck.in ही साईट चालवतो मराठी तसेच इतर भारतीय भाषांचे साहित्य जोपासण्यासाठी. तुमची परवानगी असेल तर काही लेख साईट वर टाकू इच्छितो, किंवा तुम्हीसुद्धा साईट वर लिहू शकता. कळवावे
    Siddhesh

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanyawad sir!
      mi bookstruck.in cha vachak ahe, apala upakram khupch chaan ahe. navin lekhakanna ek changla platform tumhi uplabdh karun dilat.
      mi bookstruck.in varti ragistered ahe. kahi diwasane mi swatahach tikade post karen.
      punascha dhanyawad!
      "mukt kalandar"

      Delete
  2. नमस्कार हे पुस्तक शोधण्याचा मी खूप प्रयत्न करत आहे पण कुठेही मिळाले नाही.... तरी कृपया काही माहिती असल्यास सांगावे.....

    ReplyDelete
    Replies
    1. ग्रंथालयात हे पुस्तक मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तुमच्या आसपास जर एखादे वाचनालय असेल तर तिथे शोध घ्या. नेटवरती पुणे नगर वाचनालय येथे उपलब्ध आहे असं दाखवत आहे, तसेच तुमच्या जवळपास शोधा. Best of luck.

      Delete
  3. व्वा मस्त

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद!!! इतरही लेख वाचून आपला अभिप्राय जरूर कळवा.
      धन्यवाद!!!

      Delete

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सहदेव-भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा

( डिस्क्लेमर  : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्या...

Copyright©

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.


Copyrighted.com Registered & Protected